Posts

Showing posts from March, 2021

शिव गंगा

Image
                                                          शिव गंगा स्वच्छंद फुलपाखरू एक होते बागडत निज विश्वात  पाहुनी मोहक ते बागडणे गुंतला त्याच्या रूपात  धावू नि मागे त्याच्या पकडले आपल्या करात  आनंदी फुलपाखरू ते  सोडले प्राण एका क्षणात   ! भावला तो  सुमन एक फुलांच्या ताटव्यात  हवाहवासा वाटला अन् खूडले त्यास एका दमात  विसरूनी साऱ्या जगा भिनवला त्यास धुंध श्वासात  झडले मात्र सुमन ते गाळूनी पाकळ्या आसमंतात ! कथा नसे न्यारी नरनारी ची या जगतात  भाळला तीज वरी अन् घेरीले तीस बाहुपाशात  छाटले पंख मनीचे, धरिले प्रेमाच्या विळख्यात  गुदमरले मन, झुरले तन प्रेमाच्या अलक्ष पिंजऱ्यात !   जडला जीव कुणावरी,  बहरूदे  न्हाऊनी रंगात नको पकडू, नको खुडू, नको जखडू, नाहक मोहात घे सामावूनी या गंगेस  तू शिवा सारखे अलगद जटात तारेल जगतास या चालूनी डौलात..!! ममता पार्सेकर

स्री सखी

Image
स्री सखी   सखी ! मैत्रीण ! नुसतीच मैत्रीण नाही तर जिवाभावाची मैत्रीण!  सखी, हा शब्द जरी मनात आला तरी मन सुखावून जाते शांत होते आणि आपण ही जर कुणाची सखी, जिवाभावाचे झालो तर मन अभिमानाने बहरते, फुलते. आयुष्यातले हे एकमेव असे नाते, ज्याला आपण स्वतः निवडलेले असते. निवडलेले म्हणण्यापेक्षा अलगद, हळूवार भावनांनी भारावलेले असते. सर्व नाती ही जन्मजात किंवा कुठल्या न कुठल्या अपेक्षा, भिती, आदर, मोह, आधार, दया या ना  अनेक भावनांनी प्रेरित, अवलंबून असतात. नात्यातल्या या अपेक्षा, भावना ती ती नाती अधोरेखित करतात. सखीच्या नात्यात काहीच अपेक्षा नसते, असते ते फक्त स्वातंत्र्य  आणि म्हणूनच ते सर्वात 'खास' असते. आपण जे आणि जसे आहोत तसे  ती स्वीकारते.कुठलेही स्त्री-पुरुष परिपूर्ण नसतात परंतु ही अपरिपूर्णता ओळखून हसत स्वीकारणे हे मात्र सखीच  करू शकते. सखीचे नाते हे असे  शब्दा पलीकडले असते. नुसत्या नजरेने किंवा डोळे बंद करून शांत बसून ह्या  सखीशी मनसोक्त संवाद करता येतो. जिथे शब्दही तोकडे पडतात किंवा त्यांची गरजही भासत नाही असे हे सखीचे नाते. सखी खरे तर स्वतःचे प्रतिबि...