Posts

Showing posts from August, 2020

प्रवास

Image
                                         प्रवास  प्रवास! प्रवास म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पटकन धावणारा रस्ता, पळणारी झाडे, खिडकी बाहेर काढलेला हात आणि चेहऱ्यावरचा थंड वारा! असे चित्र उभे राहते. वेगवेगळ्या लोकांसाठी प्रवासाचे वेगवेगळे संदर्भ असतात. प्रवास म्हणजे एक अनोळखी, अपरिचित रस्त्यावर घेऊन जाणारा. कधी साधा सरळ तर कधी खाचखळग्यांनी भरलेला, वेदना- यातना देणारा. प्रवास हा निर्मिती करणारा असतो. नवीन विचारांची, मूल्यांची तर कधी परिचय करून देणारा असतो नवीन विश्वाशी, माणसांशी आणि कधी तर स्वतःशीच! प्रवासात कितीही जण सोबत असले, शरीराने, मनाने तरी प्रवास हा शेवटी एकट्याचाच असतो. गर्भाचा, मातेच्या उदरात नऊ महिन्यांचा प्रवास देखील असाच. मातेशी नाळ जोडलेला परंतु प्रवास मात्र एकट्याचाच. मातेच्या उदरात त्याचे विश्व असणारा. हा प्रवासही असाच अवघड, कठीण, जीवाची घालमेल करणारा परंतु एक सुंदर निर्मिती करणारा. सगळे प्रवास असेच असतात का? जगात आल्यावर सुद्धा प्रवास काही थांबत नाही. जीवनाच्या प्रव...

माझ्या मनातला गणपती

Image
 माझ्या मनातला गणपती खरं म्हणजे मूर्तीपूजा आणि देव या भिन्न संकल्पना. मनातले सिद्धांत, संस्कार, तत्व जपायची असेल तर रोज त्यांची उजळणी करावी लागते. आपले मन मूर्तस्वरूपाला पटकन स्वीकारते. त्यामुळे देव-देवतांच्या मूर्तस्वरूपा मागील सिद्धांत,संकल्पना समजणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. माझ्या मनातला गणपती हा असाच आहे, अनेक सिद्धांतानी भरलेला. चौदा विद्यांचा स्वामी आणि कलेची आदर करायला शिकवणारा चौसष्ट कलांचा अधिपती. प्रत्येक कलेच्या सुरुवातीला ज्याचे नमन करून वंदना केली जाते तो अथर्व. भौतिक आणि अध्यात्मिक अडचणीतून मार्ग दाखवणारा असा हा अयान. पार्वतीमातेचे द्वारपाल होऊन रक्षण करणारा आणि आज प्रत्येक गाव, वेशी, मंदिर, किल्ला, गड येथे द्वाराशी पूजला जाणारा विघ्नेश्वर.  गण म्हणजे सर्व सजीव-निर्जीव सृष्टी, इंद्रिये, तत्व, वैश्विक ऊर्जा यांचा समूह. हे सर्व समूह एकत्रित येऊन विश्व निर्माण करतात. आपण जर या समूहांना पुजले नाही तर आपले पूजन अपूर्ण राहते. त्यामुळे सृष्टीच्या प्रत्येक गणाला पुजन्यापेक्षा आपण त्यांचा नेता गणपतीला पुजतो आणि प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला त्यांचा आशीर्वाद घेऊन कार्य...