प्रवास
प्रवास प्रवास! प्रवास म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पटकन धावणारा रस्ता, पळणारी झाडे, खिडकी बाहेर काढलेला हात आणि चेहऱ्यावरचा थंड वारा! असे चित्र उभे राहते. वेगवेगळ्या लोकांसाठी प्रवासाचे वेगवेगळे संदर्भ असतात. प्रवास म्हणजे एक अनोळखी, अपरिचित रस्त्यावर घेऊन जाणारा. कधी साधा सरळ तर कधी खाचखळग्यांनी भरलेला, वेदना- यातना देणारा. प्रवास हा निर्मिती करणारा असतो. नवीन विचारांची, मूल्यांची तर कधी परिचय करून देणारा असतो नवीन विश्वाशी, माणसांशी आणि कधी तर स्वतःशीच! प्रवासात कितीही जण सोबत असले, शरीराने, मनाने तरी प्रवास हा शेवटी एकट्याचाच असतो. गर्भाचा, मातेच्या उदरात नऊ महिन्यांचा प्रवास देखील असाच. मातेशी नाळ जोडलेला परंतु प्रवास मात्र एकट्याचाच. मातेच्या उदरात त्याचे विश्व असणारा. हा प्रवासही असाच अवघड, कठीण, जीवाची घालमेल करणारा परंतु एक सुंदर निर्मिती करणारा. सगळे प्रवास असेच असतात का? जगात आल्यावर सुद्धा प्रवास काही थांबत नाही. जीवनाच्या प्रव...