घराबाहेरच्या जगात आम्ही..१
घराबाहेरच्या जगात आम्ही ....भाग १ मी पटापट सुटकेस भरत होते. सगळ्या सामानांची यादी पलंगावरच ठेवली होती.काय बरोबर न्यायचे काय नाही हे सगळ्या मैत्रिणींचे आधीच ठरले होते.तशी एक लिस्टच व्हाट्सअप वर टाकली होती.सोबत घेऊन जायच्या सामानांची तयारी तर महिन्याभरापासून सुरू होती. काही मैत्रिणींची तर तीन महिन्यापासून! काय एवढी तयारी करतात या कोण जाणे! हात सुटकेस भरण्याचे काम करत असताना मेंदू घरच्या राहिलेल्या कामाचा आढावा घेत होता. फ्लाईट रात्री दहा वाजता ची होती त्यामुळे पूर्ण दिवस हातात होता .सगळ्यात महत्त्वाचे काम ब्युटी पार्लरचे, ते कालच झाले होते आता ही पॅकिंग झाली की फक्त जेवणाचे बघायचे होते.चटणी ,लोणचे तर होतेच पण अशावेळेस "मॅगी " चा खूपच आधार असतो. श्रीविष्णूची पोज घेऊन पलंगावर विराजमान झालेला नवरा माझ्या लगबगी कडे बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता. न राहवून शेवटी त्याने वाक्य फेकलेच, "एवढा उत्साह, तर तुला आपल्या हनिमूनच्या पॅकिंग च...