Posts

शिव गंगा

Image
                                                          शिव गंगा स्वच्छंद फुलपाखरू एक होते बागडत निज विश्वात  पाहुनी मोहक ते बागडणे गुंतला त्याच्या रूपात  धावू नि मागे त्याच्या पकडले आपल्या करात  आनंदी फुलपाखरू ते  सोडले प्राण एका क्षणात   ! भावला तो  सुमन एक फुलांच्या ताटव्यात  हवाहवासा वाटला अन् खूडले त्यास एका दमात  विसरूनी साऱ्या जगा भिनवला त्यास धुंध श्वासात  झडले मात्र सुमन ते गाळूनी पाकळ्या आसमंतात ! कथा नसे न्यारी नरनारी ची या जगतात  भाळला तीज वरी अन् घेरीले तीस बाहुपाशात  छाटले पंख मनीचे, धरिले प्रेमाच्या विळख्यात  गुदमरले मन, झुरले तन प्रेमाच्या अलक्ष पिंजऱ्यात !   जडला जीव कुणावरी,  बहरूदे  न्हाऊनी रंगात नको पकडू, नको खुडू, नको जखडू, नाहक मोहात घे सामावूनी या गंगेस  तू शिवा सारखे अलगद जटात तारेल जगतास या चालूनी डौलात..!! ममता पार्सेकर

स्री सखी

Image
स्री सखी   सखी ! मैत्रीण ! नुसतीच मैत्रीण नाही तर जिवाभावाची मैत्रीण!  सखी, हा शब्द जरी मनात आला तरी मन सुखावून जाते शांत होते आणि आपण ही जर कुणाची सखी, जिवाभावाचे झालो तर मन अभिमानाने बहरते, फुलते. आयुष्यातले हे एकमेव असे नाते, ज्याला आपण स्वतः निवडलेले असते. निवडलेले म्हणण्यापेक्षा अलगद, हळूवार भावनांनी भारावलेले असते. सर्व नाती ही जन्मजात किंवा कुठल्या न कुठल्या अपेक्षा, भिती, आदर, मोह, आधार, दया या ना  अनेक भावनांनी प्रेरित, अवलंबून असतात. नात्यातल्या या अपेक्षा, भावना ती ती नाती अधोरेखित करतात. सखीच्या नात्यात काहीच अपेक्षा नसते, असते ते फक्त स्वातंत्र्य  आणि म्हणूनच ते सर्वात 'खास' असते. आपण जे आणि जसे आहोत तसे  ती स्वीकारते.कुठलेही स्त्री-पुरुष परिपूर्ण नसतात परंतु ही अपरिपूर्णता ओळखून हसत स्वीकारणे हे मात्र सखीच  करू शकते. सखीचे नाते हे असे  शब्दा पलीकडले असते. नुसत्या नजरेने किंवा डोळे बंद करून शांत बसून ह्या  सखीशी मनसोक्त संवाद करता येतो. जिथे शब्दही तोकडे पडतात किंवा त्यांची गरजही भासत नाही असे हे सखीचे नाते. सखी खरे तर स्वतःचे प्रतिबि...

घराबाहेरच्या जगात आम्ही..२

Image
घराबाहेरच्या जगात आम्ही ...................भाग 2 मी मोबाईल चार्जर आणि चाव्या पर्समध्ये टाकल्या आणि परत एकदा आरशात बघून केस व्यवस्थित केले. नीलूच्या हुकुमावरून आम्ही सगळ्यांनी जीन्स-टॉप घातला होता.  काना मागचे केस मोकळे सोडून पुढच्या केसांच्या छान बारीक बारीक वेण्या केल्या होत्या. मी पुन्हा एकदा लिपस्टिक लावली व स्वतःवरच खुश होऊन स्वतःलाच एक "फ्लाईंग किस" दिले. नवरा माझे नखरे बघत होता.  माझ्याकडे बघून म्हणाला "चल आता झालं की नाही तुझं? टॅक्सी येईल पाच मिनिटात. तुमच्या बायकांचे नखरे संपतच नाहीत." "अहो, एक फोटो काढा ना माझा व तुमचा" आणि आश्चर्य म्हणजे विनातक्रार नवऱ्याने आमची एक सेल्फी काढली  आणि मी एकदम भावूक झाले. त्याला बिलगलेच. त्याच्या कमरेभोवती हात घालून, छातीवर डोके ठेवून म्हणाले "माझ्या मुलाची काळजी घ्या हां." "तो माझाही मुलगा आहे समजल ना" नवरा मला दूर करत म्हणाला. इतक्यात चिरंजीव खोलीमध्ये अवतरले. त्याला प्रेमाने जवळ घेऊन मी बोलायला सुरुवात केली "वडिलांची काळजी घे, जास्त बाहेर फिरू नको, कम्प्युटरवर जास्त गेम खेळू नको मी फो...

घराबाहेरच्या जगात आम्ही..१

Image
                                           घराबाहेरच्या जगात आम्ही ....भाग १ मी पटापट सुटकेस भरत होते. सगळ्या सामानांची यादी पलंगावरच ठेवली होती.काय बरोबर न्यायचे काय नाही हे सगळ्या मैत्रिणींचे आधीच ठरले होते.तशी एक लिस्टच व्हाट्सअप वर टाकली होती.सोबत घेऊन जायच्या सामानांची तयारी तर महिन्याभरापासून सुरू होती. काही मैत्रिणींची तर तीन महिन्यापासून!  काय एवढी तयारी करतात या कोण जाणे! हात सुटकेस भरण्याचे काम करत असताना मेंदू घरच्या राहिलेल्या कामाचा आढावा घेत होता. फ्लाईट रात्री दहा वाजता ची होती त्यामुळे पूर्ण दिवस हातात होता .सगळ्यात महत्त्वाचे काम ब्युटी पार्लरचे, ते कालच झाले होते आता ही पॅकिंग झाली की फक्त जेवणाचे बघायचे होते.चटणी ,लोणचे तर होतेच पण अशावेळेस "मॅगी " चा खूपच आधार असतो. श्रीविष्णूची पोज घेऊन पलंगावर विराजमान झालेला नवरा माझ्या लगबगी कडे बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता. न राहवून शेवटी त्याने वाक्य फेकलेच, "एवढा उत्साह, तर तुला आपल्या हनिमूनच्या पॅकिंग च...

प्रवास

Image
                                         प्रवास  प्रवास! प्रवास म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पटकन धावणारा रस्ता, पळणारी झाडे, खिडकी बाहेर काढलेला हात आणि चेहऱ्यावरचा थंड वारा! असे चित्र उभे राहते. वेगवेगळ्या लोकांसाठी प्रवासाचे वेगवेगळे संदर्भ असतात. प्रवास म्हणजे एक अनोळखी, अपरिचित रस्त्यावर घेऊन जाणारा. कधी साधा सरळ तर कधी खाचखळग्यांनी भरलेला, वेदना- यातना देणारा. प्रवास हा निर्मिती करणारा असतो. नवीन विचारांची, मूल्यांची तर कधी परिचय करून देणारा असतो नवीन विश्वाशी, माणसांशी आणि कधी तर स्वतःशीच! प्रवासात कितीही जण सोबत असले, शरीराने, मनाने तरी प्रवास हा शेवटी एकट्याचाच असतो. गर्भाचा, मातेच्या उदरात नऊ महिन्यांचा प्रवास देखील असाच. मातेशी नाळ जोडलेला परंतु प्रवास मात्र एकट्याचाच. मातेच्या उदरात त्याचे विश्व असणारा. हा प्रवासही असाच अवघड, कठीण, जीवाची घालमेल करणारा परंतु एक सुंदर निर्मिती करणारा. सगळे प्रवास असेच असतात का? जगात आल्यावर सुद्धा प्रवास काही थांबत नाही. जीवनाच्या प्रव...

माझ्या मनातला गणपती

Image
 माझ्या मनातला गणपती खरं म्हणजे मूर्तीपूजा आणि देव या भिन्न संकल्पना. मनातले सिद्धांत, संस्कार, तत्व जपायची असेल तर रोज त्यांची उजळणी करावी लागते. आपले मन मूर्तस्वरूपाला पटकन स्वीकारते. त्यामुळे देव-देवतांच्या मूर्तस्वरूपा मागील सिद्धांत,संकल्पना समजणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे. माझ्या मनातला गणपती हा असाच आहे, अनेक सिद्धांतानी भरलेला. चौदा विद्यांचा स्वामी आणि कलेची आदर करायला शिकवणारा चौसष्ट कलांचा अधिपती. प्रत्येक कलेच्या सुरुवातीला ज्याचे नमन करून वंदना केली जाते तो अथर्व. भौतिक आणि अध्यात्मिक अडचणीतून मार्ग दाखवणारा असा हा अयान. पार्वतीमातेचे द्वारपाल होऊन रक्षण करणारा आणि आज प्रत्येक गाव, वेशी, मंदिर, किल्ला, गड येथे द्वाराशी पूजला जाणारा विघ्नेश्वर.  गण म्हणजे सर्व सजीव-निर्जीव सृष्टी, इंद्रिये, तत्व, वैश्विक ऊर्जा यांचा समूह. हे सर्व समूह एकत्रित येऊन विश्व निर्माण करतात. आपण जर या समूहांना पुजले नाही तर आपले पूजन अपूर्ण राहते. त्यामुळे सृष्टीच्या प्रत्येक गणाला पुजन्यापेक्षा आपण त्यांचा नेता गणपतीला पुजतो आणि प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला त्यांचा आशीर्वाद घेऊन कार्य...